शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

यावर्षी पूरक पाऊस होईल का ? :  भिन्न अंदाजाने शेतकरी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 2:03 PM

अकोला: राज्यात पावसाचे प्रमाण घटले आहे.अलिकडच्या काही वर्षात हे प्रमाण प्रकर्षाने जानवू लागले.विदर्भात तर पावसाचे सरासरी प्रमाण घटले.

- राजरत्न सिरसाट

अकोला: राज्यात पावसाचे प्रमाण घटले आहे.अलिकडच्या काही वर्षात हे प्रमाण प्रकर्षाने जानवू लागले.विदर्भात तर पावसाचे सरासरी प्रमाण घटले. अशातच पावसाचे भाकीत करणाऱ्या यंत्रणाचे अंदाज चुकले.या सर्व परिस्थितीचा सामना करताना शेतकरी मात्र त्रस्त आहे.यातून मार्ग तर काढावाच लागणार आहे.जलपूर्नभरण,संवर्धन या गोष्टी शास्त्रशुध्द पध्दतीने करताना,पावसाचा प्रत्येक थेंब शेतात कसे जिरवता येईल.यासाठीचे शेतकऱ्यांचे गाव,बांधावर जावून तांत्रिक माहिती देणे आता अत्यंत गरजेचे आहे.कृषी शास्त्रज्ञ,तज्ज्ञांनी पाणी अडविण्यासाठी केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी आवश्यक आहे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कंटूर,उताराला आडवी पेरणी,असे अनेक प्रयोग करता येतील. असे असले तरी या प्रश्नाची व्याप्ती बरीच मोठी आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा', जलपुनर्भरण' यांसारख्या योजनांच्या अंमलबजावणीवर सातत्याने भर द्यावा लागणार आहे. विशेषत: चांगला पाऊस होतो, त्या वेळी अधिक प्रमाणात पाणी अडवले जायला हवे. त्यासाठी पाणीसाठवण क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. या संदर्भात आॅस्ट्रेलियाचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्या देशाने नदीतून वाहून जाणाºया पाण्याच्या दीडपट साठवणक्षमता निर्माण केली आहे. आपल्याकडे मात्र ही क्षमता वाहून जाणाº्या पाण्याच्या अवघी ४० टक्के इतकी आहे. आणखी एक बाब म्हणजे पाण्याच्या नेमक्या उपलब्धतेविषयी लोकांना नोव्हेंबरमध्येच कल्पना दिली जायला हवी. म्हणजे पाण्याच्या काटेकोर नियोजनाला लवकर सुरवात करता येईल. त्यातून पाण्याची बचत होत राहील. परिणामी, ऐन फेब्रुवारी-मार्च महिन्यात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे टाळता येईल. या शिवाय उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्यापर्यंतच्या कालावधीतील पाणीवाटपाचे नियोजन करायला हवे. पण तसे न होता तहान लागल्यावर विहीर खणणे' या उक्तीनुसार मार्च-एप्रिलमध्ये जाग येऊन पाणीवापराच्या नियोजनाचे प्रयत्न सुरू होतात; पण ते प्रभावी ठरत नाहीत, असेच दिसते.याशिवाय भूजल पातळी किती आहे, त्यातील किती पाण्याचा उपसा उन्हाळ्यात करावा लागणार आहे, याचेही गणित लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे साºयांनीच पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा काटकसरीने आणि संयमाने वापर करायला हवा.

- पाण्याचे काटेकोर नियोजन करताना,शेतीची बांधबदीस्ती,राण बांधणी करणे अंत्यत आवशक आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब शेतात जिरवण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशींचा अवलंब करणे तेवढेच क्रमप्राप्त आहे.डॉ. सुभाष टाले,माजी विभागप्रमुख,मृद व जलसंधारण,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

विदर्भातील चित्र बघितल्यास पाऊस आलाच तर प्रंचड वेगाने पडतो.संपूर्ण मान्सूनचा अर्धा पाऊस १६ ते १८ तासात होतो.प्रचंड वेगाने पडणारा पाऊस त्याच वेगाने वाहून जातो, हा पाऊस वाहूनच जात नाही तर सुपीक शेतातील महत्वाची १६ सुक्ष्म अन्नद्रव्य वाहून नेतो,मातीचे वाहून जाण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. या सर्व परिस्थिती कडे गार्भींयाने बघताना,आता कृती करण्याची गरज आहे.

- अलिकडच्या काही वर्षात मान्सूनचे अंदाज चुकलेदेशातील,राज्यातील शेतकरी ‘ई-शेती‘ची कास धरीत आहेत.अनेक गावात संगणक प्रणाली लावण्यात आली .शेती विकास वेगाने होत आहे पण पावसाची अनिश्चिततेमुळे शेतकºयांचा भ्रमनिरास होत आहे. पावसाच्या पडणाºया पावसाचे नियोजन नसल्याने भूगर्भ पातळी घटली.जमिनही पाणी नसल्याने या सर्व आधुनिक पध्दतीने करण्यात येणाºया शेतीवरही संकट आले. पावसाचे अंदाजही अलिकडे चुकल्याने शेतकरी सैरभैर झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी