शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची पतीला मारहाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 01:25 IST

अकोला : पतीने पत्नीचा छळ करणे तसेच मारहाण करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत; मात्र सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्नीने थेट पतीलाच सांडशी फेकून मारल्याचा प्रकार बुधवारी घडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पतीने पत्नीचा छळ करणे तसेच मारहाण करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत; मात्र सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्नीने थेट पतीलाच सांडशी फेकून मारल्याचा प्रकार बुधवारी घडला आहे. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरुद्धच मारहाणीचा गुन्हा सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला बुधवारी दाखल केला. हा प्रकार चांगलाच चर्चेचा ठरला.लहान उमरीतील रहिवासी शंकर चव्हाण यांची पत्नी सोनाली चव्हाण या दोघांमध्ये लहानसहान कारणावरून वाद सुरू आहेत. अशा वादातच सोनाली चव्हाण या बुधवारी सकाळी स्वयंपाक करीत असताना हा वाद पुन्हा उफाळला. त्यामुळे पत्नी सोनाली चव्हाण हिला राग अनावर झाला आणि तिने हातात असलेली सांडशी पतीच्या डोक्यात फेकून मारली. यामध्ये पती शंकरच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पत्नीने मारहाण केल्यामुळे स्वाभिमान दुखावलेल्या शंकरने थेट पोलीस स्टेशन गाठून पत्नी सोनालीविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी शंकरची पत्नी सोनाली चव्हाण हिच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातच नव्हे, तर पोलीस विभागातही चर्चेला उधाण आले आहे.