शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हाइट कोल’मधील चारा वापरावर येणार बंदी!

By admin | Updated: January 19, 2015 02:39 IST

अहवाल सादर करण्याचे अकोला जिल्हाधिका-यांचे निर्देश.

संतोष येलकर / अकोला: चाराटंचाईच्या परिस्थितीत ह्यव्हाइट कोलह्णमधील चार्‍याच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. व्हाइट कोल (गट्ट) तयार करणार्‍या कारखान्यांची पाहणी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्हय़ातील चारा उत्पादनातही प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनासाठी लागणार्‍या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात चाराटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होणार असून, जनावरांना जगविण्यासाठी चारा कोठून आणावा, असा प्रश्न जिल्ह्यातील पशुपालक शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, जनावरांच्या चार्‍यासाठी वापरात येणार्‍या सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, भुईमूग कुटारासह शेतीतील पालाचोळ्याचा वापर व्हाइट कोलमध्ये (गट्ट) मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यासाठी व्हाइट कोल कारखान्यांकडून विविध कुटार आणि शेतीतील पालापाचोळ्याची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. जनावरांच्या चार्‍यासाठी उपयोगात येणार्‍या कुटारांचा व्हाइट कोलमध्ये होणारा वापर चाराटंचाईत आणखीच भर टाकणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील चाराटंचाईच्या परिस्थितीत व्हाइट कोलमधील चार्‍याच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. त्यासाठी व्हाइट कोल तयार करणार्‍या अकोल्यातील औद्योगिक क्षेत्र आणि विकास केंद्रातील कारखान्यांची पाहणी करून, कारखान्यांमध्ये व्हाइट कोल तयार करण्यासाठी सोयाबीन, तूर, गहू व इतर कुटरांचा वापर केला जातो काय, यासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांना शुक्रवारी दिले. पशुधन विकास अधिकारी डॉ.रंजित गोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार व्हाइट कोल तयार करणार्‍या सहा कारखान्यांची पाहणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करून या पाहणीमध्ये व्हाईट कोल तयार करण्याकरिता चार्‍याचा वापर केला जातो काय, यासंदर्भात तपासणी करून अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगीतले.