शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एरंडीची ‘होळी’ थांबणार कधी?

By admin | Updated: March 3, 2015 23:41 IST

राज्यात ९ हजार हेक्टर क्षेत्र; वनऔषधी नष्ट होण्याच्या मार्गावर.

नीलेश शहाकार/बुलडाणा : शेताच्या धुर्‍यावर दुष्काळ प्रतिरोधक आणि कीडनाशक म्हणून लावण्यात येणारी तसेच राज्य शासनाला वर्षाला २ कोटीचे उत्पन्न मिळवून देणार्‍या एरंडीच्या झाडांवर होळीनिमित्त कुर्‍हाड चालविली जाणार आहे. होळीसाठी एंरडीचा वापर केला जात असल्यामुळे राज्यातील ९हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली बहूमुल्य वनऔषधी एरंडी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एरंडीची अशी ह्यहोळीह्ण थांबणार कधी हाच खरा प्रश्न आहे.आजही सार्वजनिक आणि घरगुती ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी पेटविली जाते. होळीत जाळण्यासाठी वृक्षतोड होते. होळीवर एरंडीच्या झाडाची फांदी बांधून होळी पेटविण्याची प्रथा आहे, यासाठी दरवर्षी एरंडीचे शेकडो झाडे कापली जातात. शेताच्या धुर्‍यावर लावण्यात आलेल्या एरंडीच्या झाडाच्या फांद्या तोडून होळीत टाकण्यात येत असल्यामुळे नित्य उपयोगात एरंडी ही वनऔषधी दुर्मिळ झाली आहे.महाराष्ट्रात एरंडीचे क्षेत्र ९000 हेक्टर असून त्यापासून मिळणारे उत्पादन २000 मेट्रीक टन आहे. बुलडाणा जिल्ह्यात एरंडीचे सरासरी क्षेत्र ५४0 हेक्टर असून एरंडी हे पीक जिरायती तसेच बागायती क्षेत्रात घेतले जाते. कोरडवाहू शेताच्या बांधावर तसेच बागायती क्षेत्रात ऊस, मिरची, पपई, द्राक्ष, वांगी, केळी इ. मुख्य पिकाभोवती किडनाशक म्हणून तसेच पारंपरीक औषधी तयार करण्यासाठी केला जातो.येत्या गुरुवारी हजारो सार्वजनिक तसेच वैयक्तिक होळ्या जळणार आहेत. यामध्ये लाकडे, गोवर्‍या, पुरणपोळी, तुप यांची आहुती देत असतात. त्यामुळे हवेत मोठय़ा प्रमाणात शुद्धता होण्यास मदतच होते, असा समज आहे. प्रत्येक होळीमध्ये एरंडीच्या झाडाची फांदी जाळण्याची परंपरा आहे. एकीकडे होळी दरम्यान ह्यझाडे लावा झाडे जगवाह्ण आवाहन होत असताना दुसरीकडे शेकडो एरंडीचे झाडे छाटली जाणार आहेत.*दोन कोटीचे उत्पन्नमुंबई परिसरात एरंडीची दरवर्षी मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. शिवाय हे पीक धारवाड, बेळगांव व सोलापूर जिल्ह्यात महत्वाचे आहे. राज्याबाहेर कोलकाता, तामिळनाडू, बैतूल, रायपूर व विलासपूर या ठिकाणी एरंडीची जास्त लागवड होते. एरंडेल तेलाचा औषधीत उपयोग होतो. म्हणून एरंडीची निर्यात करुन महाराष्ट्र शासनाला दरवर्षी २ कोटी रुपये उत्पन्न मिळते.*बहुगुणी एरंड एरंड ही वनस्पती अशी आहे की बीया, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडी वनऔषधीमुळे शहरातील वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश होतो. पाने जनावरास भरपूर खाऊ घातल्याने दूध वाढते. शिवाय पपई, द्राक्ष व इतर बागायती क्षेत्रात लावण्यात आलेले एरंडीची झाड कीडनाशक म्हूणन काम करते.