शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत होणार पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: October 17, 2014 01:22 IST

पम्पिंग मशीन दुरुस्त करण्यास कंत्राटदाराचा नकार.

अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाचपैकी दोन पम्पिंग मशीन दुरुस्त केल्यानंतर अत्यावश्यक असणारी तिसरी मशीन दुरुस्त करण्यास संबंधित कंत्राटदाराने स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. थकीत देयकामुळे कंत्राटदाराने हा निर्णय घेतल्याने जलप्रदाय विभागाची कोंडी झाली असून, शहराचा पाणीपुरवठा कधीही ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे.महान येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीनमध्ये ५ ऑक्टोबर रोजी तांत्रिक बिघाड झाला. पाण्याचा उपसा करण्यासाठी किमान दोन मशीन सलग सुरू ठेवणे व एक मशीन तयार (स्टॅन्डबाय) असणे अपेक्षित आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येतो. ६५ एमएलडी प्लांटवरील पाचपैकी अवघ्या दोन पम्पिंग मशीन सुरू आहेत. यामधील एक मशीन अचानक नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तर २५ एमएलडी प्लांटवरील ३ पैकी दोन पम्पिंग मशीन बंद राहत असल्याची स्थिती आहे. ६५ एमएलडी प्लांटवर पाचपैकी तीन मशीन सतत सुरू राहिल्यास व उर्वरित दोन कायमस्वरूपी दुरुस्त ठेवल्यास अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा करणे शक्य आहे.यादरम्यान, पम्पिंग मशीनच्या दुरुस्तीचा कंत्राट माउली नामक संस्थेला देण्यात आला असून, संबंधित कंत्राटदाराचे सुमारे २५ लाखांचे देयक थकीत आहे. देयक अदा करण्यासाठी मन पाकडून कोरडी आश्‍वासने दिली जात असल्यामुळे कंत्राटदाराने तिसरा पम्प दुरुस्त करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.अर्थातच, दोन पम्पिंग मशीनद्वारे सतत पाण्याचा उपसा करणे शक्य नसून, त्यावर दाब आल्यास कोणत्याही क्षणी मशीन जळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ऐन सणासुदीच्या दिवसात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास नागरिकांची दिवाळी पाण्याविना होईल.