शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

बंद पडलेल्या ४२२ योजनांचा पाणी पुरवठा सुरु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 2:30 PM

थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

- संतोष येलकर

अकोला : दुष्काळी परिस्थितीत थकीत वीज देयकांच्या मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदमार्फत महावितरण कंपनीकडे करण्यात आला. त्यानंतर थकीत वीज देयकापोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ग्रामीण आणि नागरी भागातील ज्या पाणी पुरवठा योजना थकीत विद्युत देयकांची रक्कम भरली नसल्याने बंद आहेत, तसेच या पाणी पुरवठा योजना सुरू केल्यानंतर लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, अशा पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या मुद्दलपैकी पाच टक्के रक्कम शासनामार्फत टंचाई निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या भागातील पाणी पुरवठा योजनांच्या नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीतील वीज देयकांचा खर्च भागविण्यासाठी टंचाई निधीतून निधी वितरित करण्यास १७ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार शासनामार्फत प्राप्त निधीतून ३० मार्चपर्यंत जिल्ह्यातील ४२२ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांतील पाच टक्के, २६ लाख ११ हजार २६६ रुपये रकमेचा भरणा जिल्हा परिषदमार्फत महावितरण कंपनीकडे करण्यात आला. थकीत वीज देयकांतील मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा करण्यात आल्याने, महावितरणमार्फत संबंधित पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे थकीत वीज देयकांपोटी जिल्ह्यात बंद पडलेल्या ४२२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.थकीत वीज देयकांचा भरणा केलेल्या पाणी पुरवठा योजना!तालुका                     योजनाबार्शीटाकळी                ५६अकोट                         ०५तेल्हारा                       १२६बाळापूर                      १०६पातूर                           २३मूर्तिजापूर                  १०६....................................एकूण                       ४२२टंचाईत २.७७ लाख ग्रामस्थांना दिलासा !थकीत वीज देयकांच्या मुद्दल रकमेपैकी पाच टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर जिल्ह्यातील ४२२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई परिस्थितीत या योजनांतर्गत गावांतील २ लाख ७७ हजार ४० ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूकmahavitaranमहावितरणAkola ZPअकोला जिल्हा परिषद