शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट; महान धरणात 6.06 टक्के जलसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:50 PM

शहरावर जलसंकट ओढवल्यास सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे कोणताही ठोस आराखडा तयार नाही.

- आशिष गावंडेअकोला: निम्मा पावसाळा उलटून गेल्यानंतरही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणात अवघा 6.06 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यांत वाशिम जिल्ह्यात नेमका किती पाऊस बरसतो, यावरच महान धरण आणि अकोलेकरांना होणाºया पाणी पुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. या सर्व ‘जर-तर’ अशा शक्यता असल्या तरीही भविष्यात शहरावर जलसंकट ओढवल्यास सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे कोणताही ठोस आराखडा तयार नाही. प्रशासन तर सोडाच, खुद्द सत्ताधारी भाजपचेही या गंभीर विषयाकडे होणारे दुर्लक्ष शहरवासीयांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.अकोला शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून (महान धरण) पाणी पुरवठा केला जातो. शहरवासीयांसाठी या धरणातून वर्षाकाठी २४ दलघमी जलसाठ्याची उचल करता येते. उर्वरित जलसाठा सिंचन व औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसाठी आरक्षित आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अद्याप काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात उण्यापुºया दीड टक्के जलसाठ्याची भर पडल्याचे समोर आले आहे. वाशिम आणि मालेगाव परिसरात दमदार पाऊस पडल्यास काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते; परंतु यंदा वाशिम जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्यामुळे या प्रकल्पात पुरेसा जलसाठा जमा झाला नसल्याची परिस्थिती आहे. आज रोजी या प्रकल्पात केवळ ५.५५ टक्के एवढा अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, यामधून अकोलेकरांना दोन ते अडीच महिन्यांपर्यंत पाणी पुरवठा करणे मनपाला शक्य होईल. अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाची एकूणच चिन्हे लक्षात घेता पावसाळ्यातील आगामी दीड महिन्यांच्या कालावधीत महान धरणाच्या जलसाठ्यात कितपत वाढ होईल, यावर शंका निर्माण झाली आहे. निश्चितच शहरावरील संभाव्य जलसंकटाचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून ठोस नियोजनाची गरज असताना त्यामध्ये अभाव असल्याचे समोर आले आहे.२००४ मधील ‘हायड्रंट’ निरुपयोगी२००४-०५ मध्ये शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मनपाने महान ते अकोलापर्यंत असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या बाजूला सुमारे १०४ ‘हायड्रंट’ निर्माण केले होते. आज रोजी सदर हायड्रंट निरुपयोगी झाले आहेत. शिवाय, त्यामधून पाण्याचा उपसा करून मुख्य जलवाहिनीद्वारे शहरापर्यंत आणणे शक्य नसल्याचा तांत्रिक मुद्दा जलप्रदाय विभागाने उपस्थित केला आहे.

...तर जलसंकटाचे सावटवाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आदी भागात ‘धो धो’ पाऊस झाल्यानंतरच महान धरणात जलसंचय होतो. गतवर्षी पावसाळ्यात ऐन अखेरच्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली होती. यंदा वाशिम जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यास अकोलेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागेल.सत्ताधारी बघ्याच्या भूमिकेत!आज रोजी अकोलेकरांना दर सातव्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पावसाचा लहरीपणा ध्यानात घेता भविष्यातील संभाव्य जलसंकटावर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने तातडीने जलप्रदाय विभागासोबत बैठकीचे आयोजन करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत.महान धरणातील जलसाठ्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सप्टेंबर महिन्यात पावसाची अपेक्षा करायला हरकत नाही. तत्पूर्वी संभाव्य उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिल्या जातील.-विजय अग्रवाल, महापौर.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका