वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:11 IST2018-02-10T02:08:45+5:302018-02-10T02:11:54+5:30

मालेगाव (वाशिम) :  पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली.

Washim: A farmer committed suicide in Pangrwadi village | वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

ठळक मुद्देघरात गळफास घेऊन केली आत्महत्याजानू भीमला चव्हाण असे मृत शेतकर्‍याचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) :  पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. जानू चव्हाण यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती.  मध्यवर्ती बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज होते तसेच खासगी सावकाराकडूनही काही कर्ज काढले होते, अशी माहिती मृतकाच्या कुटुंबीयांनी दिली. याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनला ९   फेब्रुवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Washim: A farmer committed suicide in Pangrwadi village