शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमसाठी राकाँ ठाम; काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:46 IST

मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची दाट शक्यता लक्षात घेता, काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावरून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अडून बसल्यामुळे काँग्रेस पक्षातील इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची दाट शक्यता लक्षात घेता, काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गुरुवारी दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत अकोला पश्चिम मतदारसंघावर गंभीरपणे चर्चा पार पडल्याची माहिती आहे. एकूणच चित्र लक्षात घेता काँग्रेससमोर पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्याचे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात अकोला पश्चिम मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला, या मुद्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगली आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या विजयराव देशमुख यांनी ऐनवेळेवर बंडखोरी करीत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते.त्यावेळी विजयराव देशमुख यांना २६ हजार ९८१ तर काँग्रेसच्या उषा विरक यांना अवघ्या ९ हजार १६४ मतांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला जास्त मते मिळाली असल्याचा मुद्दा उपस्थित करीत यंदाही या मतदारसंघावर राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. वस्तुस्थिती निराळी असून, राष्ट्रवादीसाठी त्यावेळी काँग्रेसची संपूर्ण फळी सक्रिय झाली होती. मनपातील काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी देशमुख यांच्यासाठी मेहनत घेतल्याचे चित्र होते.त्याचा फटका काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार उषा विरक यांना बसला होता. त्यामुळे २०१४ व २०१९ मधील निवडणुकीत मोठा फरक असल्याचे नमूद करीत काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ काँग्रेसक डे सोपवावा, अशी रास्त मागणी लावून धरल्याची माहिती आहे; परंतु हा मतदारसंघ भविष्यातही राष्ट्रवादीच्या वाट्याला कायम राहील, या उद्देशातून राष्ट्रवादी पक्ष अडून बसला आहे. यामुळे दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीतही तोडगा निघू शकला नसल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?सद्यस्थितीमध्ये या मतदारसंघात भाजपला टक्कर देण्याइतपत प्रबळ आणि सक्षम असा दावेदार राष्ट्रवादीकडे उपलब्ध नसल्याचे खुद्द पक्षाचे स्थानिक पदाधिकारीही खासगीत मान्य करतात. त्यामुळे राकाँकडे उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या काही सक्षम उमेदवारांनाच गळाला लावण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला संबंधित इच्छुक ांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची चर्चा आहे.

काँग्रेसला बंडखोरीची चिंता४अकोला पश्चिम मतदारसंघात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसची मजबूत बांधणी व पकड आहे, यात दुमत नाही. तरीही हा मतदारसंघ राकाँच्या वाट्याला गेलाच तर पक्षांतर्गत बंडखोरी होण्याची पक्षाला चिंता आहे. तसे झाल्यास भविष्यात या मतदारसंघातून काँग्रेसची पीछेहाट होण्याची जास्त शक्यता आहे.

पक्षातून उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम आहे. पक्षाचा अंतिम निर्णय मान्य राहील. जागा वाटपात शेवटच्या क्षणी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला तरी पक्षाच्या निर्देशानुसार पुढील काम केले जाईल, यात तसूभरही शंका नाही.-साजीद खान पठाण,विरोधी पक्षनेता काँग्रेस.

हा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे, याची राष्ट्रवादीला पूर्ण जाणीव आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद वगळल्यास या ठिकाणी काँगे्रसच मजबूत दावेदार आहे. जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, अशी अपेक्षा आहे.-डॉ. जिशान हुसेन,नगरसेवक काँग्रेस.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस