शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात जमिनीला पडल्या भेगा!

By admin | Updated: September 28, 2014 23:12 IST

उष्णतामान वाढले; खरीप पिकांवर पुन्हा नवे संकट.

अकोला : यंदा विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता जमिनीला प्रचंड भेगा पडल्याने परिपक्वतेच्या अवस्थेत असलेल्या खरीप पिकांसमोल नवे संकट उभे ठाकले आहे.यंदा दोन महिने विलंबाने पावसाळय़ाला सुरुवात झाली. जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्याच्या शेवटी आला. पावसाचे प्रमाण विदर्भात एकसारखे नव्हते. पूर्व विदर्भात दमदार कोसळला, तर पश्‍चिम विदर्भात तेवढा जोर नव्हता. त्यामुळे पेरण्यांची वेळ निघून गेली. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांनी ऑगस्टच्या पंधरवड्यानंतरही पेरणी केली. या पेरणीला अडिच महिने विलंब झाला. उशिरा पेरणीमुळे उत्पादनात फरक पडेलच, असे माहीत असूनही शेतकर्‍यांनी खरेदी केलेले बियाणे पेरणेच पसंत केले. या परिस्थितीत पश्‍चिम विदर्भातील २0 टक्के शेतकर्‍यांनी तिफण थांबविली. म्हणजेच खरीप हंगामातील २0 टक्के क्षेत्रावरील पेरण्या यंदा झाल्याच नाहीत. शेतकर्‍यांनी सर्वाधिक सोयाबीन, कापूस या वाणांची पेरणी केली आहे. विदर्भात जवळपास १८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आले आहे, तर कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात १0 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. आता ही सर्व पीकं परिपक्वतेच्या अवस्थेत आहे; पण या भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीला प्रचंड भेगा पडल्या असून, उष्णतामानात प्रचंड वाढ झाल्याने जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे शेतजमीन कडक झाली असून, बर्‍याच भागातील जमीन फाकली आहे. त्याचा फटका खरीप पिकांना बसताना दिसतो आहे. जमीन फाकल्यामुळे पिकांच्या मुळापर्यंत तापमान व हवा पोहोचत असल्याने पिके वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. परतीचा पाऊस आला तरच खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.पाऊस कमी आणि तापमान वाढल्याने जमीन कडक झाली असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. ही वेळ पिके परिपक्वतेची आहे. यावेळी पावसाची खरी गरज असते. पाऊस आला तरच, सोयाबीनच्या शेंगामधील दाणे भरतात आणि कपाशीचे पात्या, फुले पक्व होतात. त्यामुळे ज्या ठिकाणी संरक्षित ओलिताची सोय आहे, तेथे शेतकर्‍यांनी पिकांना पाणी द्यावे, डवरे देता येतील तेथे डवर्‍याची सोय करू न भेगा बुजविण्याचे प्रयत्न करावे, असे कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांनी सांगीतले.