शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेवर साहित्य जप्तीची नामुष्की

By admin | Updated: September 30, 2014 01:52 IST

कंत्राटदाराची रक्कम अदा करण्याचे न्यायालयाचे आदेश

अकोला : बांधकाम विभागामार्फत विकास काम केलेल्या कंत्राटदाराचे देयक अदा न करणार्‍या मनपा प्रशासनाला स्थानिक न्यायालयाने चांगलाच झटका दिला. कंत्राटदाराची रक्कम अदा करा, अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साहित्य जप्त करण्यासाठी मनपात दाखल झालेल्या न्यायालयाच्या कर्मचार्‍यांना अक्षरश: सायंकाळपर्यंत प्रशासनाने झुलवत ठेवले. अखेर सायंकाळी प्रशासनाने न्यायालयात दीड लाख रुपये जमा करून स्थगनादेश मिळवल्याने साहित्य जप्तीची नामुष्की टळली. कंत्राटदार राजनारायण सिंग यांचे बांधकाम विभागामार्फत केलेल्या विकास कामाचे २00८ पासून ४ लाखाचे देयक थकीत आहे. मनपा देयक अदा करीत नसल्यामुळे सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. वर्षाकाठी साडेबारा टक्के व्याजाची आकारणी करीत ६ लाख रुपये द्या अन्यथा मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी जारी केले. साहित्य जप्तीसाठी चक्क मेटॅडोर मनपात आणण्यात आला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. न्यायालयातील संबंधित कर्मचार्‍यांना प्रशासनाने सायंकाळपर्यंत ताटकळत ठेवले. मनपाच्या विधी अधिकार्‍यांनी तडक न्यायालयात एकूण रकमेच्या २५ टक्केप्रमाणे दीड लाख रुपये जमा करीत तात्पुरता स्थगनादेश मिळवल्याने जप्तीची कारवाई टळली.