शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

उमा प्रकल्प ओव्हरफ्लो, पिंपळशेडा व शिवण प्रकल्प निम्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 20:25 IST

Murtijapur News : पिंपळशेंडा व शिवण लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षा जास्त जलसाठा आहे.

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली आहे. तालुक्यातील ५७ खेड्यांचासाठी संजीवनी असलेला व महत्वाचा असलेला उमा प्रकल्प शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शंभर टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला असला तरी पिंपळशेंडा व शिवण लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षा जास्त जलसाठा आहे.       तालुक्यातील महत्वपूर्ण व पिण्याच्या पाण्याठी वापण्यात येत असलेला उमा प्रकल्पावर लंघापुर पाणी पुरवठा योजने अंतर्गत ५७ खेडी अवलंबून आहेत. याच बरोबर दोन लघु प्रकल्पांमध्ये पिंपळशेंडा ६२.५६ टक्के तर शिवण ६४.६१ टक्के भरलेले आहे. उमा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ५७ खेडी योजनेतील गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दुर झाली आहे. परंतु पिंपळशेडा व शिवण या लघु प्रकल्पांवर शेत सिंचनाचे मोठे क्षेत्र अवलंबून आहे. ११.६८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या उमा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या लंघापुर ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत ५७ खेड्यांसाठी ०.७० दशलक्ष घनमीटर जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर २२४१ हेक्टर शेती सिंचनासाठी ६ ते ७ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव आहे. सद्यस्थितीत या जलाशयाने ३४४.०० असलेली पातळी ओलांडून ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन ७६.६४ विसर्ग होत आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडूनही  पिंळशेडा व शिवण प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा असल्याने भविष्यात शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जसाठ्यातुन  बाष्पीभवन वगळून केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊ शकेल, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे अशक्यप्राय असल्याची स्थिती आहे.        २०१९ मध्ये उमा व पिंपळशेंडा प्रकल्प २१ अॉगष्ट पर्यंत १०० टक्के भरुन ओसंडून वाहत होते. मात्र यावर्षी २७ सप्टेंबर पर्यंत या प्रकल्पात निम्म्याच्यावरच जलसाठा उपलब्ध झाला आहे. उमा प्रकल्पामध्ये आजचा १०० टक्के, पिंपळशेंडा ६२.५६ टक्के तर शिवण ६४.६१ टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे. शिवण आणि पिंपळशेंडा लघु प्रकल्पातून पाण्याचा केवळ शेती सिंचनासाठी उपयोग होतो परंतु अंत्यत कमी जलसाठा उपलब्ध असल्याने परीसराती रब्बी हंगामही धोक्यात येणार असल्याने पिक उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अद्यापही ही जलाशये तुडूंब भरली नसल्याने भविष्यात तालुक्यातील बागायती शेती व रब्बी हंगामात यापाण्यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात येणार आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरDamधरण