शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

 पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिनीला लागणार दोन वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:01 IST

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे.

अकोला: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवटच असून, पूर्णा बॅरेजच्या भूमिगत जलवाहिन्या कामाला आणखी दोन वर्ष लागण्याची शक्यता असल्याने पाणी जरी साठले तरी हे पाणी शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष मिळणार नाही, अशी अवस्था आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याची तयारी आहे; परंतु वक्रद्वार कार्यान्वित करण्यासाठी येथे विजेचा पुरवठाच झाला नसल्याचे चित्र आहे.पूर्णा बॅरेज-२ खारपाणपट्ट्यातील बॅरेज असून, हे बॅरेज बांधून झाल्यास नेरधामणा व या भागातील गावच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तद्वतच अकोलेकरांसाठीही बॅरेजमध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षण राहील; परंतु अद्याप या बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. येत्या सप्टेंबरपर्यंत बॅरेजला १२ वक्रद्वार लावण्याचा बेत आहे. तो पूर्ण होतो की नाही, हे वेळच सांगेल. त्यासाठी येथे वीजच नाही. वक्रद्वार जरी लावले तरी शेतकºयांना सिंचनासाठी सध्यातरी पाणी मिळणे कठीणच आहे. शेतापर्यंत पाणी नेण्यासाठीची भूमिगत जलवाहिनीचा नकाशाच तयार नाही. या कामाला ११६ कोटीवर खर्च आहे. आता जरी सर्व प्रक्रियेला सुरुवात केली तरी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मध्येच नवीन तरंग पद्धत अवलंबविण्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असेल तथापि, हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भूमिगत नलिकेचा प्रयोग करणे किंवा सरळ पाटचाºया, कॅनॉलच टाकावे लागणार आहे.कवठा बॅरेजच्या कामातही अडथळा आला आहे. या भागातील लोहारा पुलाचे काम थंड बस्त्यात असल्याने या बॅरेजचे पाणी शेतकºयांना केव्हा उपलब्ध होणार, हा प्रश्नच आहे. कारंजा रमजानपूर प्रकल्पाचे काम पूर्ण झालेच नाही, उमा बॅरेजचे काम ठप्प आहे. काटीपाटी प्रकल्पाला लागणारी सुधारित प्रशासकीय मान्यता शासन दरबारी रखडली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

टॅग्स :Ner-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेजAkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प