Two tonnes of cannabis seized in Akola | अकोल्यात तब्बल दोन टन भांग जप्त

अकोल्यात तब्बल दोन टन भांग जप्त

अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लकडगंज परिसरात मनोज बलोदे नामक युवकाचा घरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती वरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापा टाकून त्याच्या घरातून सुमारे 2 हजार 135 किलो भांग जप्त केली. या भांगची किंमत दोन लाख 13 हजार रुपये असून आरोपीविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्कडगंज येथील रहिवासी मनोज रामहरक बलाेदे याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पडताळणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती नक्की झाली. त्यानंतर विशेष पथकाने सापळा रचून बुधवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात घराची झडती घेतली असता मनोज बलोदे यांच्या घरातून 2 हजार 135 किलो भांग व सहा किलो भिजवलेली भांग अशाप्रकारे एकूण 2 हजार 141 किलो भांग जप्त केली. ही भांग सुमारे दोन टन असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष पथकाने मनोज बलाेदे यांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या भांगची किंमत दोन लाख 13 हजार 575 रुपये असून यासह आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

 

भांग जप्तीची ऐतिहासिक कारवाई

अकोला तर नव्हे तर राज्यभरात एकाच वेळी सुमारे दोन टन भांग जप्त करण्याची कारवाई प्रथमच झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आतापर्यंत भांग जप्त केल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी मोठ्या प्रमाणात भांग जप्त केल्यानंतर ही ऐतिहासिक कारवाई असल्याची चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे.

Web Title: Two tonnes of cannabis seized in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.