शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : दोन ठार,एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:45 IST

महान(अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देदिनकर भानुदास पळघणे व चंदुसिंग जाधव रा.मारखेड असे मृतकांची नावे आहेत.दुचाकी ५० ते ६० फुटापर्यंत फरफटत जाउन तिघेही रस्त्यावर फेकल्या गेले. रुग्णालयात उपचारादरम्यान दिनकर पळघणे आणि चंदुसिंग जाधव यांचा मृत्यू झाला.

महान(अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना महान जवळ १९ जुलै रोजी दुपारी घडली. दिनकर भानुदास पळघणे व चंदुसिंग जाधव रा.मारखेड असे मृतकांची नावे आहेत.बार्शीटाकळी तालुक्यातील मारखेड येथील दिनकर भानुदास पळघणे (३७), बाळू भानुदास पळघणे (४२) आणि चंदुसिंग जाधव (४५)हे तिघे दुचाकी क्र.एमएच ३० डब्ल्यू १३२९ ने शुक्रवारी दुपारी पिंजरवरून महानकडे येत होते. दरम्यान, महान जवळील बोथना नाल्यावर महानकडून पिंजरकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली.ही धडक एवढी भीषण होती की दुचाकी ५० ते ६० फुटापर्यंत फरफटत जाउन तिघेही रस्त्यावर फेकल्या गेले. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महान पोलीस चौकीचे जमादार रमेश राठोड, इम्रान खान यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच संत गाडगे बाबा आपत्कालीन पथकानेही घटनास्थळावर पोहचून जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान दिनकर पळघणे आणि चंदुसिंग जाधव यांचा मृत्यू झाला. दुचाकी धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनाच्या चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. दरम्यान, दुचाकीस धडक देणारे वाहन प्रवाशी वाहन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.पुढील तपास महान पोलीस चौकीचे जमादार रमेश राठोड करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातBarshitakliबार्शिटाकळी