शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी-ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात दोन ठार

By admin | Updated: March 1, 2015 21:17 IST

अकोल्याजवळ रांजदा फाट्याजवळची घटना; १0 जण गंभीर जखमी.

चिखलगाव (जि.अकोला) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणार्‍या अँपे ऑटोरिक्षाला राजंदा फाट्यानजीक जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षातील दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर १0 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.एमएच ३0 टी-८४९0 क्रमांकाचा अँपे ऑटोरिक्षा रविवारी दुपारी अकोल्याहून चिंचोली रुद्रायणीकडे जात असताना राजंदाफाट्याजवळ पातूरकडून अकोल्याकडे येणार्‍या एम.एच.0७ सी-९४२२ क्रमांकाच्या वाशिम-शेगाव एस.टी.बसने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात या अँपे ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ऑटोरिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला. यावेळी ऑटोरिक्षातून १२ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात ऑटोरिक्षातून प्रवास करणार्‍यांपैकी चिखलगाव येथील आनंद व्यंकटराव थोरात (६0), चिंचोली रुद्रायणी येथील पूजा काशीनाथ वर्गे (१५) हे दोन प्रवासी जागीच ठार झाले तर चिखलगाव येथील गुणवंत थोरात (४0), वैभव गुणवंत थोरात (१५), चिंचोली रुद्रायणी येथील पल्लवी वर्गे (११), योगिता शिवराम वर्गे (३0), उमेश नारायाण पराडे (२८), मंगला उमेश पराडे (२७), खामखेड येथील गुरुदेव मते (३0), मेहकर येथील धनाबाई रामचंद्र सरसरे (४0), म्हैसपूर येथील सावित्रीबाई गजानन उन्हाये (३0) व वाघजाळी येथील ऑटोरिक्षाचालक रणजित राठोड (३0) हे गंभीर जखमी झाले.शुभम उमेश पराडे हा तीन वर्षीय बालक या अपघातातून सुखरुप बचावला. जखमींना उपचारासाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात होताच एसटी बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू होती.