शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पॅथालॉजिस्टला खंडणी मागणारे दोघे गजाआड

By admin | Updated: March 6, 2015 01:52 IST

पोलिसांत तक्रार न करण्यासाठी मागितली साडेतीन लाखांची खंडणी.

अकोला : पॅथालॉजिस्टने दिलेल्या रक्त तपासणी अहवालावर नाव, सही, नोंदणी क्रमांक नसल्याबाबत पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांना साडेतीन लाख रुपयांची खंडणी मागणारे चंद्रकांत झटाले व अश्‍विन नवले यांच्याविरुद्ध गुरुवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. गजाआड केलेल्या या दोघा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल. सुधीर कॉलनीमध्ये राहणारे अविनाश नामदेवराव उंबरकर(२९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शास्त्रीनगरातील मालवीय इस्पितळात त्यांची पॅथालॉजी लेबॉरेटरी आहे. आरोपी चंद्रकांत बापूराव झटाले (३२ रा. दत्त कॉलनी) हा २ मार्च रोजी डॉ. आशिष लाहोळे यांच्या सांगण्यावरून उंबरकर यांच्या लेबॉरेटरीमध्ये गेला. तेथे त्याने रक्त तपासणी करून घेतली. ३ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तो रक्त तपासणीचा अहवाल घेण्यासाठी लेबॉरेटरीमध्ये गेला. त्याला मिळालेल्या अहवालावर पॅथालॉजिस्टचे नाव, सही, नोंदणी क्रमांक नव्हता. याबाबत झटाले यांनी अविनाश उंबरकर यांच्यासोबत हुज्जत घातली. तुम्ही बोगस पॅथालॉजिस्ट आहात, तुमची पोलिसांत तक्रार देतो, अशी धमकी देऊन त्याने सहकार्‍यांनाही लेबॉरेटरीमध्ये बोलावून घेतले. डॉ. मालवीय व उंबरकर यांच्यासोबत वाद घातल्यानंतर सर्व जण तेथून निघून गेले. गुरुवारी दुपारी चंद्रकांत व अश्‍विन नवले यांनी उंबरकर यांना फोन करून पोलिसांत तक्रार करीत असल्याची माहिती दिली. पोलिसांत तक्रार होऊ द्यायची नसेल, तर साडेतीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी व दमदाटी केली. त्यामुळे अविनाश उंबरकर यांनी या दोघांविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३८४ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.