चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार
By सचिन राऊत | Updated: March 10, 2024 20:18 IST2024-03-10T20:17:32+5:302024-03-10T20:18:00+5:30
सचिन राऊत/ अकोला : पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पातूर-अकोला रस्त्यावरील कापशी रोड गावाजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ...

चारचाकी वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार
सचिन राऊत/ अकोला : पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पातूर-अकोला रस्त्यावरील कापशी रोड गावाजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. ही घटना रविवार, १० मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही मृतक अकोला शहराजवळील शिवणी येथील रहिवासी आहेत.
कापशी रोड गावाजवळील शांतादेवी मंदिरासमोर (एमएच २६ सीएच ००९४) क्रमांकाचे चारचाकी वाहन भरधाव वेगाने अकोला येथून वाशिम जिल्ह्यातील मालेगावकडे जात होते. या गाडीची (एमएच ३० एएल ३६६७) या क्रमांकाच्या मोटारसायकलला धडक लागली. यामध्ये मोटारसायकलवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये आशिष सुरेश खंडारे (वय २४) आणि आदित्य राहुल खंडारे (२२) या दोन युवकांचा समावेश आहे. हे दोघेही अकोला शहराजवळील शिवनी येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळातच ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.