शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

नवसाला पावणारी आई तुळजाभवानी..!

By admin | Updated: September 27, 2014 00:51 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील जागृत तुळजा भवानी मंदीर

मूर्तिजापूर : येथून १८ कि.मी. अंतरावरील ग्राम विराहित हे गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास ३ ते ४ हजारांचे वर असून, येथे नवसाला पावणार्‍या आई तुळजाभवानी यांचे प्रशस्त असे मंदिर संस्थान आहे. हे संस्थान जागृत संस्थान म्हणून प्रचलित आहे. विराहित हे गाव शहरापासून दूर जरी असले तरीही भक्तांची दरवर्षी नवदुर्गा उत्सवादरम्यान प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी होते.मूर्तिजापूर तालुक्यातील विराहित येथे भक्तांना जाण्या-येण्यासाठी अकोला व मूर्तिजापूर येथून खासगी व ए.टी. बसेस उपलब्ध आहेत. मंदिराबाहेरील खंडित विविध प्रकारच्या मूर्तींवरून हे सिद्घ होते की, हे मंदिर मुगलकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी काहीच नव्हते मूर्तिजापूर येथील मनोहरराव किडे यांचे वडिलाचे वडील बाबूजी किडे हे अनेक वर्षांपासून आई तुळजा भवानीची पायदळ वारी करीत होते. त्यांचे वयाचे परिस्थितीमुळे त्यांनी तुळजाभवानीस एकदा वारीदरम्यान आता माझी वारी करण्याची क्षमता नसून, आता माझे तुझ्या दरबारी येणे शक्य होणार नाही, असे त्यांनी देवीला सांगताच आई तुळजाभवानीने साक्षात बाबूजी किडे यांना दर्शन देऊन जरी तुझे येणे शक्य नाही; पण मी तुझ्या सोबत तुझ्या पाठीमागे येईल. तू पाठीमागे वळून पाहणार नाही, असे सांगून आई तुळजाभवानी बाबूजी किडे यांच्या मागे परतीच्या प्रवासाला निघाली. काही अंतर गेल्यावर चुकून बाबुजी किडे यांनी मागे वळून पाहिले ते गाव होते, मूर्तिजापूर तालुक्यातील विराहित. आईने त्याच गावात विराजमान होण्याचा निर्णय घेतला आणि विराहित येथे बाबूजी किडे यांचे हस्ते आई तुळजाभवानीची स्थापना करण्यात आली.पाहता पाहता गावातील आई तुळजाभवानीच्या भक्तांनी काही हेक्टरमध्ये मंदिर बनविले. आता दर नवरात्रीला येथे भक्तांची नऊ दिवस प्रचंड गर्दी असते. गेल्या अनेक वर्षांपासून आजही या मंदिरात अखंड दिवा जळत आहे. विराहित येथून जवळच येणार्‍या काजळेश्‍वर, कंझरा, घोटा, पिंजर, वाई, कानडी, पातूर नंदापूर, धानोरा वैद्य येथून भक्त विराहितची पायदळ वारी करतात.