ट्रकची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 18:06 IST2022-07-12T18:04:33+5:302022-07-12T18:06:05+5:30
Accident News : वर्षा नाजूक गवई (३८) या जागीच ठार झाल्या, तर मुलगी काजल नाजूक गवई (१८) ही गंभीर जखमी झाली.

ट्रकची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू, मुलगी गंभीर
मूर्तिजापूर : काटेपूर्णा येथून मूर्तिजापूरकडे दुचाकीवरुन येत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत एक महिला ठार, तर तीची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (१२ जुलै) दुपारी १:३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील दाळंबी गावाजवळ घडली.
काटेपूर्णा येथील नाजूक चंपत गवई (४०) हे एमएच ३० बीएफ ३६९३ क्रमांकाच्या दुचाकीने मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथे पत्नी व मुलीसह येत असताना विरुद्ध दिशेने जात असलेल्या एमएच १२ टीव्ही ९९९२ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील महिला वर्षा नाजूक गवई (३८) या जागीच ठार झाल्या, तर मुलगी काजल नाजूक गवई (१८) ही गंभीर जखमी झाली. दुचाकी चालक नाजूक चंपत गवई (४०) हे किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती कळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह व जखमीला मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. काजल हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचाराकरिता अकालो येथे पाठविण्यात आले. या संदर्भात बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.