संविधानाचा सरनामा हाच ‘वंचित’चा जाहीरनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 05:07 IST2024-04-16T05:07:01+5:302024-04-16T05:07:59+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी केला ‘वंचित’चा जाहीरनामा प्रकाशित

संविधानाचा सरनामा हाच ‘वंचित’चा जाहीरनामा
लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला : भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच वंचित बहुजन आघाडीचा सरनामा असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रकाशित केला.
कंत्राटी कामगाराचे वयाचे ५८ वर्षे पूर्ण हाेईपर्यंत निवृत्त करू नये, शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करण्यात येईल. शिक्षण ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. म्हणून त्याला ९ टक्क्यांपर्यंत घेऊन जाणार आहाेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विकण्यापासून वाचवून अधिक बळकट करू, शेतीपूरक उद्याेगांना प्राधान्य, कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार व साेयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दिले जातील, तसेच शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा, हे मुद्दे प्रामुख्याने हाताळले जातील, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती, जमातींच्या आरक्षण संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. एआरसी आणि सीएए पूर्णपणे असंवैधानिक असल्याचेही ते म्हणाले.