शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
5
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
6
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
7
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
8
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
9
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
10
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
11
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
12
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
13
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
14
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
15
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
16
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
17
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
18
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
19
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
20
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार किलो आंब्याचा साठा जप्त

By admin | Updated: May 3, 2014 19:05 IST

बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जाणार्‍या आंब्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी छापेमारी केली.

सचिन राऊत

अकोला - बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जाणार्‍या आंब्याच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी छापेमारी केली. या छापेमारीत आरोग्यास घातक असलेला सुमारे दोन हजार ८९६ (तीन टन) किलो आंबा जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून ट्रकने येत असलेला आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर अकोला अन्न व औषध प्रशासन आणि अमरावती येथील दक्षता पथकाने ही कारवाई केली. आंब्याचा साठ्यावर राज्यातील ही पहिली कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
जिल्ह्यात आंब्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून दर तिसर्‍या दिवशी तब्बल ८ ते १० ट्रक कच्चा आंबा विविध ठिकाणांवर आणून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर सदर आंबा बाजारात विक्रीसाठी आणण्यात येत आहे. आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाइडचा वापर करण्यात येत असून, यामध्ये फॉस्फरस आणि अर्सेनिक हे रासायनिक घटक असल्याने हा पिकलेला आंबा यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम करतो. यासोबतच आंब्यातील रसाला पिवळा रंग आणण्यासाठी गॅसचा वापर करण्यात येत असून, आंबा सडू नये यासाठीही त्यावर विशेष प्रक्रिया करण्यात येत असल्याचे केंद्रच अकोल्यात असल्याचे लोकमतने समोर आणले होते. या वृत्तानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मुंबई येथील दक्षता पथकाचे सहआयुक्त यांनी दिलेल्या आदेशावरून अमरावती दक्षता पथक आणि अकोला अन्न व औषध प्रशासनाने बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजवर गुरुवारी छापा मारून आरोग्यास घातक असलेला सुमारे दोन हजार ८९६ किलो आंबा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या आंब्याची किंमत दोन लाख रुपये असली तरी अन्न व औषध प्रशासनाने होलसेल दरानुसार या आंब्याची किंमत सुमारे ५५ हजार रुपये सांगितली. जप्त करण्यात आलेल्या आंब्याचा काही साठा नष्ट करण्यात आला असून, उर्वरित साठा जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाचे शरद कोलते, नीलेश ताथोड, रावसाहेब वाकडे, अमरावती दक्षता पथकाचे फरीद सिद्दीकी यांच्या पथकाने केली.