शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक; मायलेकांसह तीन जागीच ठार, जमावाने बस पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 15:17 IST

बार्शीटाकळी (अकोला) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली.

बार्शीटाकळी (अकोला) : भरधाव जात असलेल्या लक्झरी बसने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीन जण ठार झाल्याची घटना अकोला ते मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)जवळ बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लक्झरी बसची तोडफोड करून पेटवून दिली.खासगी प्रवासी वाहतुक करणारी बस (एम.एच. ३७ बी. ६९४९) अकोला येथून मंगरुळपीरकडे जात होती.त्याचवेळी दगडपारवा येथून एम.एच. ३० - एडब्ल्यू ७८५१ क्रमांकाच्या दुचाकीवर दगडपारवा येथील तीघे जण   बार्शीटाकळीच्या दिशेने जात होते. या खासगी बसने बार्शीटाकळी व दगडपारवा गावाच्या दरम्यान असलेल्या आयटीआय जवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये दुचाकीवरील अनुराधा प्रकाश राठोड, नितीन प्रकाश राठोड (दोघेही रा. दगडपारवा) व अस्मिता पवार (१४, रा. दहातोंडा, ता. मूर्तीजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दगडपारवा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खासगी बसची तोडफोड केली. ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बस पेटवून दिली. घटनेची माहिती समजताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. जमावाचे उग्र पाहता पोलिसांनी अकोल्याहून अतिरिक्त कुमक बोलावली.

 

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीAccidentअपघात