शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

अकोला जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार,१० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 6:14 PM

Accidents in Akola district तीन अपघातात तीन ठार तर १० जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.

अकोला: जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात तीन ठार तर १० जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पहिल्या घटनेत अंदुरा-आडसूळ मार्गावर कापसाने भरलेले मालवाहू खड्ड्यांमुळे चालकाचे  नियंत्रण सुटल्याने मालवाहू उलटला. या अपघातात तीन जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. ग्राम हाता येथून कापूस घेऊन जाणारा मीनीडोअर क्रमांक एमएच ०४, जीसी ९४२० क्रमांकाचे वाहन उलटले. तळेगाव-बाभूळगाव येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून शेगावकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८, एव्ही ३२८८ दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रल्हाद अडकणे रा. दसरानगर, शेगाव (६०) हे तर मालवाहू वरील दोण जण जागीच ठार झाले आहेत. दुसऱ्या घटनेत राष्ट्रीय महामार्गावर अकोलाहून मुर्तिजापूरकडे जाणारा कंन्टेनर ट्रक क्रमांक जी.जे.१२ बी.एक्स. या वाहनाची ट्रॉली उलटली. रस्त्यावर ट्रॉली उटल्यामुळे मुर्तिजापूरकडे जाणारी कार क्रंमाक एम.एच.३० ए झेड३९४६ व अकोल्याकडे येणारा ट्रक क्रमांक एम.एच.३६ ए.ए.२२१६ यांचा समोरासमोर धडक झाली. या तिहेरी अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र कारमधील एक जण गंभीर जखमी झाला. तर तिसऱ्या घटनेत पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोला