लैंगिक शाेषण करून फाेटाे व्हायरल करण्याची धमकी, महिलेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By राजेश शेगोकार | Published: June 13, 2023 12:31 PM2023-06-13T12:31:07+5:302023-06-13T12:33:13+5:30

या प्रकरणात  सिव्हिल लाइन पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल.

Threatening to spread the word viral by harrasment the woman tried to commit suicide | लैंगिक शाेषण करून फाेटाे व्हायरल करण्याची धमकी, महिलेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

लैंगिक शाेषण करून फाेटाे व्हायरल करण्याची धमकी, महिलेने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

अकोला : महिला काम करीत असलेल्या ठिकाणी चौकीदार असलेल्या युवकाने तिचे काही अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून सोन्याचे दागिने उकळले. नंतरही पैशांचा तगादा लावत, त्याने बळजबरीने लैंगिक शोषण केले. त्यानंतरही तिला धमकी देत, तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले. त्याच्या छळाला कंटाळून ३४ वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात  सिव्हिल लाइन पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शहरातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार २०२० पासून ती साडी वर्कचे काम करते. त्यासाठी चौकीदार म्हणून काम करणारा आरोपी कैलास अशोक धाबे (२४) रा. कृषिनगर याने तिचे चोरून काही फोटो, व्हिडीओ काढून तिला पैशांची मागणी केली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने त्याला सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर कैलास धाबे हा पैशांची मागणी करीत होता.

तिच्याकडे पैसे नसल्याने, आरोपीने बळजबरीने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतरसुद्धा तो वारंवार लैंगिक अत्याचार करायचा. त्यावेळीसुद्धा त्याने फोटो काढले आणि ते प्रसारित करण्याची धमकी देत होता. अखेर महिलेने सिव्हिल लाइन पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Threatening to spread the word viral by harrasment the woman tried to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.