चोरट्यांनी लांबविले सुमारे १०० किलो केस!

By नितिन गव्हाळे | Updated: September 4, 2023 20:32 IST2023-09-04T20:32:27+5:302023-09-04T20:32:46+5:30

 २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले होते.

Thieves removed about 100 kg of hair | चोरट्यांनी लांबविले सुमारे १०० किलो केस!

चोरट्यांनी लांबविले सुमारे १०० किलो केस!

अकोला: एका केस खरेदी-विक्रीच्या दुकानात शिरून चोरट्यांनी काय लांबविले असेल तर...ते केस. १ किलो नव्हेतर सुमारे १०० किलो केस चोरट्यांनी चोरून नेले आहेत. या केसांची किंमत २ लाख ५० हजार रूपये आहे. याप्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. कृषि नगरात राहणारे रामा मुकींदा अंभोरे(४७) यांच्या तक्रारीनुसार त्यांनी पीएच मार्केटमध्ये त्यांचे भाड्याचे दुकान असून, या दुकानामध्ये ते केस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.

 २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी दुकान बंद करून ते घरी गेले होते. २९ ऑगस्ट रोजी दुकानात सकाळी आल्यावर त्यांना, दुकानाचे लोखंडी शटर वाकलेले दिसले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून १५० किलो केसांपैकी १०० किलो केस चोरून नेले. या केसांची किंमत अडीच लाख रूपये असल्याचे त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Thieves removed about 100 kg of hair