शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेतीसाठी निश्‍चित धोरण असावे- आर. जी. दाणी

By admin | Updated: March 4, 2015 02:21 IST

विदर्भातील कोरडवाहू शेती आणि विकास परिषदेला अकोल्यात प्रारंभ.

अकोला : कोरडवाहू शेतीचा विकास साधायचा असेल, तर शासनाने कोरडवाहू शेतीविषयी निश्‍चित धोरण ठरविणे तसेच कोरडवाहू शेती विकासाबाबत कृषी विद्यापीठाने काढलेल्या निष्कर्षांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांनी केले.विदर्भ संशोधन, तंत्रज्ञान आणि ग्रामीण कृषी विकास असोसिएशनच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात ह्यविदर्भातील कोरडवाहू क्षेत्र आणि विकास या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ३ मार्च रोजी या परिषदेचे उद्घाटन डॉ. दाणी यांनी केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे मृद् संधारण विभागाचे संचालक सुरेश अंबुलगेकर, कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.जी. बथकल, संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पी. जी. इंगोले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा असोसिएशनचे संघटन सचिव डॉ. महेंद्र नागदेवे यांची उपस्थिती होती. विदर्भातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात अल्पभूधारक असून, कोरडवाहू शेतीवर त्यांची गुजराण आहे. कोरडवाहू शेतीतून कमी खर्चात अधिक उत्पादन काढण्यासाठी संशोधनाची गरज आहे. याकरिता या कृषी विद्यापीठाला कोरडवाहू शेती संशोधन केंद्राची गरज असल्याचे डॉ. दाणी यांनी अधोरेखित केले. विदर्भातील खारपाणपट्टय़ावर संशोधन करावे लागणार असल्याने शासनाकडे त्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे ते म्हणाले. अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक असताना विदर्भ सिंचन सधन योजनेसाठी आपण पाठपुरावा केल्याचे अंबुलगेकर यांनी सांगितले. कोरडवाहू क्षेत्रात मृद् व जल संवर्धन ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.