शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १०  जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:12 IST

राज्यातील १० जिल्हे असेही आहेत, ज्या ठिकाणी आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही.

- प्रवीण खेतेअकोला : राज्यात कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, २४ जिल्हे महामारीने प्रभावित झाले आहेत. गत दोन दिवसात या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे; मात्र राज्यातील १० जिल्हे असेही आहेत, ज्या ठिकाणी आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. ही बातमी दिलासादायक असली, तरी आणखी काही दिवस सतर्कता बाळगण्याची गरज आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे राज्यभरात संचारबंदी लावली. शिवाय, जिल्ह्यांच्या सीमाही सील केल्यात. त्यामुळे राज्यांतर्गत होणाऱ्या स्थलांतरणाला आळा घालणे शक्य झाले. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोना प्रभावित जिल्ह्यांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूदरही वाढत आहे. ही राज्यासाठी चिंताजनक बाब असली, तरी संचारबंदी आणि सीमाबंदीमुळे राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही बाधित रुग्ण आढळला नाही, ही दिलासा देणारी बातमी आहे. या जिल्ह्यांमध्ये बाधित रुग्ण नसला, तरी दररोज संदिग्ध रुग्णांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस लक्षणीय वाढ आहेत आहे. अशा परिस्थितीत घाबरुन न जाता कोरोनाशी दोन हात करत घरातच थांबणे योग्य ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सोशल डिस्टन्सिंगची गरजराज्यातील या १० जिल्ह्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली, तरी अनेकांकडून बेफीकरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. बहुतांश लोक कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी विशेषत: भाजी बाजारात गर्दी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे कोरोनापासून दूर असलेल्या या जिल्ह्यांमध्येही धोका कायम आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे.

या जिल्ह्यांमध्ये नाहीत कोरोनाबाधितअकोला, बीड, भंडारा, धुळे, गडचिरोली, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एकही बाधित रुग्ण नाही.नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे. आणखी काही दिवस नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळल्यास कोरोना विरुद्धची लढाई नक्कीच जिंकू. नागरिकांनी संयम पाळावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक , अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या