शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गजर नाही!

By admin | Updated: December 25, 2014 01:05 IST

लवकरच कार्यान्वित होणार ‘ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक टोक डिस्ट्रीब्यूशन सिस्टिम’

अकोला : तत्काळ रेल्वे आरक्षण तिकिट मिळण्याची वेळ सकाळी १0 वाजता असली तरी त्यासाठी पहाटे ६ वाजतापासूनच रांगा लागण्यास प्रारंभ होतो. तत्काळ तिकिट काढण्यासाठी लागणार्‍या लांबच लांब रांगा आणि त्यासाठी प्रवाशांचा जाणारा वेळ वाचविण्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासन उपाययोजना करीत असून ह्यटोकण सिस्टिमह्ण सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जोधपूर रेल्वे स्थानक पाहणी करण्याच्या दृष्टीकोनातून तेथील डीआरएम फेरफटका मारला असता त्यांना स्थानकावर पहाटे ५ वाजताच एक वृद्ध आपल्या नातवासह तत्काळ तिकिटासाठी तिकिट खिडकी समोर येऊन बसल्याचे निदर्शनास आले. कडाक्याच्या थंडीत बसलेल्या त्या वृद्धास त्यांनी ह्यकन्फर्म तिकिटह्ण देण्याचे आश्‍वसन देऊन घरी पाठविले. तत्काळ तिकिट काढण्यासाठी प्रवाशांची होत असलेली घालमेल लक्षात घेऊन त्यांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रवाशांना टोकन देण्यास प्रारंभ केला. संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करणार्‍या व्यक्तीस ९ वाजता तिकिट खिडकीवर पोहचावे लागेल. भारतीय रेल्वे प्रशासनाने हा ह्यजोधपूर पॅटर्नह्ण संपूर्ण देशात लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ह्यऑनलाईन इलेक्ट्रॉनिक टोकन डिस्ट्रीब्यूशन सिस्टिमह्ण सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामास लागले असून, लवकरच ही प्रणाली संपूर्ण देशात कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती आहे. संकेतस्थळावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आईडी क्रमांक आदि माहिती भरल्यानंतर, प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर आरक्षण केंद्रावरील काऊंटर नंबर एसएमएसद्वारे प्राप्त होईल. तत्काळसाठी ९ वाजता तिकिट खिडकी गाठणार्‍या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरील एसएमएसची तपासणी झाल्यानंतरच रांगेत उभे राहता येणार आहे. यामध्ये महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार असून, रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.