एका रात्रीत तीन दुकाने फोडली, नागरिकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 16:49 IST2022-01-06T16:49:11+5:302022-01-06T16:49:17+5:30

Crime News : कोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Theft in three shops in one night, causing panic among the citizens | एका रात्रीत तीन दुकाने फोडली, नागरिकांमध्ये भीती

एका रात्रीत तीन दुकाने फोडली, नागरिकांमध्ये भीती

अकोला : गायगाव परिसरातील दर्ग्यासमोर असलेली तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी ४ जानेवारीच्या रात्री फोडली. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चाँद दाऊद गुंगीवाले यांच्या तक्रारीनुसार नायगाव परिसरातील दर्ग्यासमोर त्यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे लोखंडी शटर चोरट्यांनी वाकवून दुकानातील अडीच हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्यांच्या दुकानाच्या बाजूला असलेले शेख अशफाक शेख युसूफ यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानातही चोरट्यांनी शिरून गल्ल्यातील रोख ४०० रुपये, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटची पाकिटे असा ३८०० रुपयांचा माल लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी लगतच्या मो. शकील यांच्या बेकरीकडे मोर्चा वळवून दुकानातील केक बनविण्याची मशीन, गल्ल्यातील ३५०० रुपये असा ८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Theft in three shops in one night, causing panic among the citizens