Temperature : सलग तिसऱ्या दिवशी अकोला विदर्भात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 19:51 IST2021-05-06T19:51:23+5:302021-05-06T19:51:29+5:30
Temperature: गुरुवारी जिल्ह्यात ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Temperature : सलग तिसऱ्या दिवशी अकोला विदर्भात अव्वल
अकोला : जिल्ह्याला मे हिटचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यात सलग तीन दिवस जिल्ह्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक नोंदविल्या गेले आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहे. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून नागरिकांना सुमारे ४३ अंशापेक्षा जास्त उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे अकोलेकरांच्या जीवाची काहिली होत आहे. तर गुरुवारी देखील उष्णतेची तीव्रता कायम राहिली. सलग तीन दिवस जिल्ह्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक नोंदविल्या गेले.
मागील तीन दिवसांचे तापमान
३ मे ४१.६
४ मे ४२.८
५ मे ४३.४
वाढत्या तापमानामुळे आजार बळावले!
जिल्ह्यात प्रचंड तापमानामुळे ताप, उलट्या, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. विशेषत: लहान मुलांना वाढत्या तापमानाचा सामना करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.