शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तेल्हारा : हिवरखेड येथे जपल्या आहेत महात्मा गांधींच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:26 IST

हिवरखेड : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने हिवरखेड येथे आजही जपल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर १९४८ साली त्यांचे अस्थिस्मारक हिवरखेड येथे उभारण्यात आले आहे. देशभरात नवी दिल्लीनंतर हिवरखेड येथे हे दुसरेच स्मारक आहे. स्मारकाला नवी दिल्ली येथील स्मारकासारखे बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनवीन पिढय़ांना राष्ट्रभक्तीची शिकवण 

गोवर्धन गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने हिवरखेड येथे आजही जपल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर १९४८ साली त्यांचे अस्थिस्मारक हिवरखेड येथे उभारण्यात आले आहे. देशभरात नवी दिल्लीनंतर हिवरखेड येथे हे दुसरेच स्मारक आहे. स्मारकाला नवी दिल्ली येथील स्मारकासारखे बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.१९४८ मध्ये तत्कालीन मंत्री स्व. ब्रिजलाल बियाणी यांनी महात्मा गांधी यांच्या अस्थी चांदीच्या पेटीत हिवरखेड येथे आणल्या होत्या. त्यानंतर हिवरखेड येथील तत्कालीन आमदार संपतराव भोपळे यांनी सदाशिव संस्थान येथे त्या अस्थीचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले. तथापि स्मारकाचे काम रखडलेले आहे. पुढे २0१६ मध्ये लोकवर्गणीतून अस्थिस्मारकाचे काम सुरू करण्यात आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तत्कालीन एसडीओ शैलेश हिंगे यांनी या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन दिले होते; परंतु शासनाकडून निधी मिळाला नाही. आता दिल्ली येथील राजघाटाच्या धर्तीवर हिवरखेड येथे महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून, शासनाकडून या अस्थिस्मारकाला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. 

नवीन पिढय़ांना राष्ट्रभक्तीची शिकवण महात्मा गांधीच्या प्रथम पुण्यस्मरणाला ३0 जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन कलेक्टर डी.ए. व्हाईट यांच्या हस्ते अस्थी रक्षा स्मारकाची कोनशिला बसविण्यात आली होती. यावेळी हिवरखेडच्या राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्य सैनिकांसह परिसरातील जनता उपस्थित होती. आजही हे स्मारक स्वातंत्र्याच्या लढय़ातील हिवरखेडचं योगदान सांगत येणार्‍या पिढय़ांमध्ये राष्ट्रभक्ती पेटती ठेवत आहे. 

टॅग्स :Telharaतेल्हाराMahatma Gandhiमहात्मा गांधी