शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 13:18 IST

अकोला: शैक्षणिक चढाओढ, स्पर्धा आणि वाढत्या बेरोजगारीमुळे किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात गुरफटत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आले आहे.

- प्रवीण खेतेअकोला: शैक्षणिक चढाओढ, स्पर्धा आणि वाढत्या बेरोजगारीमुळे किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात गुरफटत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आले आहे. २०२० पर्यंत हा आजार जगातील दुसरा सर्वांत मोठा आजार ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज या अहवालातून समोर आला आहे. गत दशकात या आजारात १८ टक्क्यांनी वाढ झाली असून, यामध्ये २५ टक्के किशोरवयीन भारतीयांचा समावेश आहे.शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये स्पर्धा अन् शैक्षणिक चढाओढ सुरू झाली आहे. शिक्षणाचा टप्पा गाठत असतानाच किशोरवयीन मुला-मुलींना रोजगाराची चिंता सतावत असते. त्यात प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात; परंतु प्रयत्न केल्यावरही काही बिघडले की मन अस्वस्थ होते. ही अस्वस्थता व अपेक्षापूर्ती न होणे एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर नैराश्य येते. हे नैराश्य म्हणजेच ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ होय. २०२० पर्यंत ही स्थिती आणखी गंभीर होणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेतर्फे व्यक्त केली आहे.तरुणी व महिलांमध्ये आजाराची वृद्धी‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ हा आजार मागील काही वर्षांत तरुणी आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे विशेष. या प्रकरणीदेखील जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.आजाराची लक्षणे काय?

  1. झोप व्यवस्थित न लागणे
  2. रात्र-रात्रभर बेचैन असणे
  3. भूक लागण्याचे प्रमाण कमी होत जाणे
  4. सातत्याने बेचैन वाटणे, हाता-पायांना सतत घाम येणे
  5. आत्मविश्वास कमी होत जाणे
  6. थकवा व सुस्ती जाणवत राहणे
  7. एकाग्रता कमी होणे

‘एन्ग्झायटी डिप्रेशन’चा असा करा बचाव!

  • प्रथमत: मनमोकळे बोला
  • नियमित व्यायाम करा
  • तुमच्यातील सुप्त कलेला वाव द्या
  • नकारात्मकतेपासून दूर राहा
  • आपल्या कामाची, परिस्थितीची समीक्षा करा
  • नुसताच विचार करीत रात्र-रात्र जागू नका
  • निसर्गोपचाराचाही विचार करा
  • विशेष म्हणजे चुकांवर रडत बसू नका 

वय वर्ष १२ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये स्पर्धेचा ताण जास्त वाढला आहे. निसर्गाच्या विरुद्ध जगण्याची जीवनशैली घातक ठरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’ असून, त्यामुळे शारीरिक व मानसिक रचनेत बरेच बदल होतात. हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ.

 

टॅग्स :Healthआरोग्यAkolaअकोला