शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक घामाघूम; शाळेसाठी विद्यार्थीच सापडेना!

By admin | Updated: June 6, 2014 01:17 IST

अकोला मनपा शिक्षण विभाग उदासीन; आयुक्तांचे दुर्लक्ष

अकोला : येत्या २६ जूनपासून शालेय सत्राला सुरुवात होणार आहे. मनपा प्रशासनाने बालवाडी व सेमी इंग्लिशचा प्रस्ताव लागू करण्यासाठी आखडता हात घेतल्याने शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांवर घामाघूम होण्याची वेळ आली आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या २0 दिवसांचा अवधी शिल्लक असताना, शिक्षकांना विद्यार्थीच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास अनेक शाळांवर समायोजनाची कुर्‍हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेच्या शाळा येत्या २६ जूनपासून सुरू होतील. खासगी कॉन्व्हेंटच्या तुलनेत मनपा शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुमार असण्यासाठी प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे धोरण कारणीभूत असल्याचे उघड होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती राज्य शासन सकारात्मक निर्णय घेत असताना, स्थानिक स्वराज्य संस्था मात्र शिक्षण प्रणालीत कोणताही फेरबदल करण्यास तयार नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. बहुतांश मनपा शाळेत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे व शासनाच्या योजनांचा वेळोवेळी लाभ पोहोचविणे शिक्षण विभागाचे नैतिक कर्तव्य आहे.
मनपाच्या रटाळ शिक्षण प्रणालीमुळे सर्वसामान्य कुटुंबांनी मनपाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होत असून, मनपा शाळांसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवताना शिक्षकांची प्रचंड दमछाक होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षण प्रणालीत बदल करण्याची आवश्यकता असताना, या मुद्याकडे मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासह शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांचे दुर्लक्ष होत आहे.