तेल्हारा : हिवरखेड येथे शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:06 IST2017-12-25T20:45:41+5:302017-12-25T21:06:14+5:30
हिवरखेड : येथील विकास मैदानात राहणार्या शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली.

तेल्हारा : हिवरखेड येथे शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या!
ठळक मुद्देकडूनिंबाच्या झाडाला घेतला गळफासआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : येथील विकास मैदानात राहणार्या शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. येथील रितेश रामकृष्ण दामधर (१६) या दहाव्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्याने सोमवारी सकाळी ९ वाजता शेतातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची बाब नंतर उघडकीस आली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान हिवरखेड पोलीस पुढील तपास करीत आहेत.