शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

विदर्भातील बुलडाणा, वर्धा लोकसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:52 PM

अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे.

ठळक मुद्देपुण्यात एका कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर संघटना पातळीवर मार्चेबांधणी सुरू झाली आहे. तुपकरांना ऐनवेळी म्हाडा मतदारसंघातही उमेदवारी देण्याचीही शक्यता आहे.

 - राजेश शेगोकर 

अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजु शेटटी यांनी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर संघटना पातळीवर मार्चेबांधणी सुरू झाली आहे.गेल्याच महिन्यात पुकारलेल्या दूध आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. राज्यातील वर्धा, बुलडाणा, हातकंणगले, कोल्हापूर, म्हाडा, सांगली या लोकसभा मतदारसंघावर स्वाभिमानीने लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सहभागी झाली होती. भाजपा-सेनेची सत्ता आल्यावर स्वाभिमानीला सदाभाऊ खोत यांच्या रूपाने विधानपरिषदेची एक जागा व मंत्रीमंडळात स्थान तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळ देऊन सत्तेत वाटाही मिळाला मात्र शेतकऱ्यांप्रश्नावर हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. दरम्यानच्या काळात कृषी राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत व खासदार शेटटी यांचे संबध ताणल्यागेल्यामुळे सदभाऊंची पक्षातुन हकालपटटी केली. तुपकरांनी महामंडळाचा राजीनामा दिला व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमधून बाहेर पडली. सत्तेतुन बाहरे पडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची तिव्रता वाढविली. गेल्याच महिन्यात झालेल्या दूध आंदोलनामुळे शेतकºयांना जादा भाव मिळवून देण्यात यशस्वी झाले असल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दूणावला असल्याने आता लोकसभेची तयारी सुरू केली आहे.बुलडाण्यात स्वाभिमानीच्या वतिने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना तर वर्धेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली जाणार आहे. बुलडाण्यात विविध आंदोलनाच्या माध्यमातुन तुपकरांनी स्वाभिमानीचे जाळे मजबुत केले असले,तरी त्यांचा सामना हा शिवसेना व राष्टÑवादी या दोन पक्षांशी आहे. तुपकरांना ऐनवेळी म्हाडा मतदारसंघातही उमेदवारी देण्याचीही शक्यता आहे. गेल्या वेळी स्वाभिमानीने म्हाडामधून चांगलीच टक्कर दिली होती. माजी खासदार मोहीते यांनी शिवसेना, काँग्रेस,शिवसंग्राम असा प्रवेश करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला असल्याने त्यांच्या वलयाचा पक्षाला फायदा होईल असा स्वाभिमानीचा होरा आहे. वर्धामतदारसंघात समाविष्ट असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या दोन विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीने चांगली बांधणी केली आहे. उर्वरित वर्धा मतदारसंघात स्वाभिमानीला नव्यानेच समिकरण मांडावे लागणार आहे.

अन्यथा स्वबळावर लढणारलोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमध्ये सहभागी होऊ शकते. शिवसेना सत्तेतुन बाहेर पडली व स्वबळावर लढली तर सेनेसोबत जाण्याचा पर्याय स्वाभिमानीने खुला ठेवला आहे. लोकसभेच्या सहा जागांवर तयारी सुरू केली असली तरी किमान चार जागा शिवाय तडजोड केली जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.कुठल्याही पक्षासोबत आघाडी न झाल्या स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.आघाडी किंवा युती बाबत खासदार शेटटी यांची भूमिका स्पष्ट आहे. भाजपासोबत कुठल्याही परिस्थितीत निवडणुक लढविली जाणार नाही त्यामुळे इतर पक्षांचा पर्याय खुला आहे. आम्ही सहा मतदारसंघात स्वबळावरच तयारीला लागलो आहोत-रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाVidarbhaविदर्भRavikant Tupkarरविकांत तुपकर