शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये १0 हजारावर प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: December 25, 2014 01:07 IST

सर्वाधिक प्रकरणे नागपूर व अमरावती विभागात.

अकोला: राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये १0 हजार २५६ प्रकरण अद्यापही प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांमध्ये नागपूर व अमरावती विभागांमधील प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे. पोलीस विभागासोबतच आरोग्य व इतर विभागांमधील प्रकरणांशी संबधित नमुन्यांच्या तपासणीसाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अहवालाची गरज असते. विविध स्वरूपाच्या गंभीर गुन्हय़ांमध्ये पोलीस पुराव्यांची भौतिक तपासणी, व्हिसेरा, दारूगोळा तपासणी, जीवशास्त्रासंबधित तपासणी, डीएनए तपासणीसाठी नमुने पाठवितात; परंतू प्रयोगशाळांमधून या नमुन्यांचे वर्षानूवर्षे अहवालच प्राप्त होत नाहीत. अहवाल प्राप्त झाला तर पोलीस अधिकार्‍यांचा तपास संपलेला असतो आणि न्यायालयातील प्रकरणांचाही निकाल लागलेला असतो. पोलीस तपास व न्यायदानामध्ये महत्त्वपूर्ण असलेला अहवाल वेळेवर प्राप्त होत नसल्याने अनेकवेळा आरोपींची निर्दोष मुक्तता होते. असे असतानाही प्रयोगशाळांमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत गांभिर्याने विचार होताना दिसत नाही.जिल्हास्तरावर व्हाव्यात 'लॅब्स'!प्रलंबित प्रकरणांमुळे गुन्हेगारीसंदर्भात न्यायनिवाडा करताना न्यायालयाला अडचणी येतात. त्यामुळे गृह विभागाने लक्ष घालून न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमधील प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढावीत आणि अहवाल तातडीने प्राप्त व्हावेत, यासाठी शासनाने जिल्हा व तालुकास्तरावर लहान न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली होती.