हिंगोलीच्या जंगलातून आराेपीला आणले शाेधून!

By राजेश शेगोकार | Published: June 15, 2023 01:29 PM2023-06-15T13:29:44+5:302023-06-15T13:31:29+5:30

महिलेवर अत्याचार; सिव्हील लाईन्स पाेलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

suspect was brought from the forest of hingoli police registered case | हिंगोलीच्या जंगलातून आराेपीला आणले शाेधून!

हिंगोलीच्या जंगलातून आराेपीला आणले शाेधून!

googlenewsNext

राजेश शेगाेकार, अकोला : कामाच्या ठिकाणी असलेल्या चाैकादाराने महिलेचे  अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून सोन्याचे दागिने उकळले, नंतर ब्लकमेल करत  बळजबरीने लैंगिक शोषण केले. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून सिव्हील लाईन पाेलीसांनी आराेपी विराेधात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी कैलास अशोक धाबे (२४) हा फरार झाला होता; परंतु सिव्हिल लाइन पोलिसांनी त्याचा माग काढत, २४ तासांतच त्याला हिंगोलीजवळील जंगलातून बुधवारी पहाटे अटक केली.

शहरातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार २०२० पासून ती एका दुकानात काम करते. त्याठिकाणी चौकीदार म्हणून काम करणारा आरोपी कैलास अशोक धाबे (२४) रा. कृषिनगर याने तिचे चोरून काही फोटो, व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल केले. घाबरलेल्या महिलेने त्याला सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर आरोपीने बळजबरीने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतरसुद्धा तो वारंवार लैंगिक अत्याचार करायचा. त्याच्या छळाला कंटाळून ३४ वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अखेर महिलेने  सिव्हिल लाइन पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हिंगोलीजवळून जंगलात आरोपी कैलास धाबे याला अटक केली.

Web Title: suspect was brought from the forest of hingoli police registered case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.