शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ; पण..

By admin | Updated: September 10, 2014 01:44 IST

भारिप-बमसंची पत्रकार परिषद; पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

अकोला : महापौरपदासाठी काँग्रेसला पाठिंबा न देण्याच्या भूमिकेवरून भारिप-बमसंच्या पदाधिकार्‍यांनी ऐन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घूमजाव केले. काँग्रेसने नगरसेविका साफिया खातून आझाद खान यांचे नाव निश्‍चित केल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका पक्षाचे डॉ. रहेमान खान यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी मनपातील भारिपचे गटनेता, समन्वयक तसेच एकही नगरसेवक उपस्थित नव्हते, हे येथे उल्लेखनीय. सत्तापक्ष काँग्रेसने अडीच वर्षाच्या कालावधीत सभागृहात भारिप-बमसंला सहकार्य न केल्यामुळे शहराचा विकास रखडला. काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्यांमध्ये भारिपची प्रचंड बदनामी झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत कोणत्याही परिस्थि तीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करण्याची भूमिका भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांनी जाहीर केली होती. अवघ्या तीनच दिवसात भारिपने निर्णयात बदल करीत अटी व शर्तींंचा पेटारा उघडल्याने पक्षाचे धोरण स्पष्ट नसल्याचे समोर आले. काँग्रेस नगरसेविका साफिया खातून आझाद खान यांना महापौरपदाची उमेदवारी दिल्यास त्यांना मतदान करण्याची भूमिका भारिप-बमसंच्यावतीने डॉ. रहेमान खान यांनी मांडली.