शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कु-हाडदे येथे तरुण शेतक-याची आत्महत्या, शेतात घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:22 IST

नऊ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

ठळक मुद्देकर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची  माहितीकुटुंबिय शेतात गेले असता प्रकार आला लक्षात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11-  शेतात गुरांना चारा टाकून येतो, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडलेल्या भरत महारु पाटील (वय 28, रा.कु:हाडदे, ता.जळगाव) या तरुण शेतक:याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री कु:हाडदे शिवारात घडली. भरत याचा नऊ महिन्यापूर्वीच विवाह झालेला होता. कर्जबाजारीपणामुळे भरत याने आत्महत्या केल्याची  माहिती समोर आली आहे.
भरत याने मंगळवारी रात्री कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर शेतात गुरांना चारा टाकून येतो, असे सांगून शेताचा रस्ता धरला.  शेतात गेल्यानंतर त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली.  कुटुंबिय शेतात गेले असता हा प्रकार लक्षात आला.  त्याला   जिल्हा   रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.  काही महिन्यापूर्वी कंपनीतील कामाच्या पैशातून त्याने दोन म्हशी घेतल्या होत्या. बुधवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.