तेल्हारा तालुक्यात शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 20:23 IST2017-12-08T20:14:41+5:302017-12-08T20:23:04+5:30
तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वरुड वडनेर येथील ५५ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ डिसेंबरच्या रात्री घडली. शे. हारुण शे. गफुर असे मृतकाचे नाव आहे.

तेल्हारा तालुक्यात शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देवरुड वडनेर येथील घटनाशे. हारुण शे. गफुर असे मृत शेतकर्याचे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वरुड वडनेर येथील ५५ वर्षीय शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ डिसेंबरच्या रात्री घडली. शे. हारुण शे. गफुर असे मृतकाचे नाव आहे.
वरुड वडनेर येथील शे.हारुण यांनी ७ डिसेंबरच्या रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी शे. सलाम शे. सुबाम यांनी तेल्हारा पोलिसात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. तेल्हारा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.