सस्ती येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 19:57 IST2017-11-17T19:51:10+5:302017-11-17T19:57:20+5:30
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथील जवाईपुरामधील शेतकरी दिनकर बोचरे यांचा पुत्र महादेव दिनकर बोचरे (२१) याने राहत्या घरात गळफस घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.

सस्ती येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देचान्नी पोलीस हद्दितील सस्ती येथील घटनाजवाईपुर्यातील महादेव दिनकर बोचरे या युवकाने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस बु. (अकोला): चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथील जवाईपुरामधील शेतकरी दिनकर बोचरे यांचा पुत्र महादेव दिनकर बोचरे (२१) याने राहत्या घरात गळफस घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खारडे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार आदिनाथ घाटेकर, देवेंद्र चव्हाण, मोहन ढवळे आदींनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. तसेच युवकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.