व्याळा येथे पती-पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:12 IST2017-11-28T00:04:27+5:302017-11-28T00:12:36+5:30
व्याळा (अकोला): येथील प्लॉट भागात राहणार्या पती-पत्नीने घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली.

व्याळा येथे पती-पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
व्याळा (अकोला): येथील प्लॉट भागात राहणार्या पती-पत्नीने घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली.
व्याळा येथे प्लॉट भागात राहणार्या भारत विष्णू डोंगरे (३0) व अश्विनी भारत डोंगरे (२७) यांनी घरासमोरील विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळवर गर्दी केली होती. काही नागरिकांच्या मदतीने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, भारत डोंगरे यांचा घटनास् थळावरच मृत्यू झाला, तर अश्विनी डोंगरे यांना रुग्णालयात हलविण्यात आले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ग्रामपंचायतच्यावतीने गावासाठी पाणी सोडण्यात आलेल्या विहिरीत या दाम्पत्याने आत्महत्या केली. त्यांच्या लग्नाला सहा महिने झाले होते. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. गावामध्ये पाणीटंचाईचे सावट असून, ही विहीर वगळता एकाही विहिरीत पाणी नाही, हे विशेष.