शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 20:12 IST2017-11-09T20:11:16+5:302017-11-09T20:12:47+5:30
हिवरखेड: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून हिवरखेड येथील वॉर्ड क्र. ४ येथील शेतकर्याने स्व त:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी आत्महत्या केली. अकिलखा मन्नानखा (४१) असे मृत शे तकर्याचे नाव आहे.

शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून हिवरखेड येथील वॉर्ड क्र. ४ येथील शेतकर्याने स्व त:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी आत्महत्या केली. अकिलखा मन्नानखा (४१) असे मृत शे तकर्याचे नाव आहे.
वॉर्ड क्र. ४ मधील रोशन प्लॉट येथील रहिवासी आकिलखा मन्नानखा हे ८ नोव्हेंबर रोजी रात्री घरून निघून गेले होते. ९ नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजताच्या दरम्यान मालठाणा शे तशिवारातील त्यांच्या शेतात गळफास लावलेल्या त्यांचा मृतदेह आढळून आला. अकिलखा मन्नानखा यांच्या नावे चार एकर कोरडवाहू शेत असून, त्यांच्या नावे सेवा सहकारी सोसायटीचे ५५ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. तसेच काही लोकांकडूनही त्यांनी उसनवार म्हणून रक्कम घेतल्याची माहिती आकिलखा यांच्या नातेवाइकांनी दिली. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अकिलखा यांना तीन मुली व एक मुलगा असून, त्यांच्या दोन मुली लग्नाला आलेल्या आहेत. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी तेल्हारा येथे पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.