रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आलेल्या भावाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:02 IST2020-08-07T11:00:18+5:302020-08-07T11:02:00+5:30

पातूर तालुक्यातील जांब येथील २२ वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.

Suicide of brother who came to sister for Rakshabandhan | रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आलेल्या भावाची आत्महत्या

रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आलेल्या भावाची आत्महत्या

ठळक मुद्देरक्षाबंधन झाल्यावरही वैभव तेथेच थांबला. दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पांढुर्णा : चितोडा येथे बहिणीच्या रक्षाबंधनासाठी आलेल्या पातूर तालुक्यातील जांब येथील २२ वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
जांब येथे राहणारा करण ऊर्फ वैभव बाळू डोंगरे (२२) हा रक्षाबंधनाच्या तीन दिवस अगोदरच खामगाव तालुक्यातील चितोडा येथील बहिणीकडे गेला होता. रक्षाबंधन झाल्यावरही वैभव तेथेच थांबला. त्याने ६ आॅगस्ट रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता अकोला रुग्णालयात पाठविण्यात आला.

 

Web Title: Suicide of brother who came to sister for Rakshabandhan