शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

५८३ पदांवर विषय शिक्षकांच्या नियुक्त्या गुरुवारपासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 14:01 IST

अकोला: गत काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्यांविषयी प्राथमिक शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

अकोला: गत काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्यांविषयी प्राथमिक शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. आता प्रभारी शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार दिनेश तरोळे यांच्याकडे सोपविल्यानंतर, त्यांनी ५८३ पदांवर विषय शिक्षकांच्या नियुक्त्या गुरुवारपासून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच पदवीधर शिक्षकांचे समुपदेशनाने समायोजन करून पदस्थापना देण्यात येणार आहे.दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विषय शिक्षकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. यासंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक समन्वय समितीची बैठक सुद्धा झाली होती. या बैठकीत ग्रामविकास मंत्र्यांनी विषय शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिला होता. आॅनलाइन बदली प्रक्रियेच्या रॅण्डमायझेशन राउंडमधील अकोला जिल्हा परिषदेत शिक्षक बदली प्रक्रियेनंतर विषय शिक्षकांसाठी (पदवीधर शिक्षक) राखीव असलेल्या ५८३ पदांवर सहायक शिक्षकांना पदस्थापना करण्यात आले. ५८३ विषय शिक्षकांची रिक्त पदे प्राथमिक शिक्षकांतील पदवीधर शिक्षकांमधून भरण्याचे निर्देशसुद्धा दिले होते. त्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने केवळ ८00 शिक्षकांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्या होत्या; परंतु पुढे काहीच झाले नाही. ८0 दिवस उलटूनही विषय शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात न आल्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; परंतु मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्याकडे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याचे आदेश दिल्याने, तरोळे यांनी विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियोजन केले आहे. २७ डिसेंबर रोजी ८ ते १0 च्या शिक्षकांमधील जे शिक्षक पदवीधर आहेत, त्यांचे समुपदेशन पद्धतीने समायोजन करून पदस्थापना देण्यात येणार आहे. तसेच २८ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून नियुक्त्या देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

पदवीधर शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने समायोजन करून पदस्थापना देण्यात येणार आहे. तसेच २८ डिसेंबरपासून मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या विषय शिक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात येतील. त्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.- दिनेश तरोळे, प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक