‘महानिर्मिती’च्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धा सोमवारपासून नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 17:27 IST2019-08-17T17:27:00+5:302019-08-17T17:27:05+5:30
नाशिक येथे महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धेचे आयोजन १९ ते २३ आॅगस्ट २०१९ या कालावधीत करण्यात आले आहे.

‘महानिर्मिती’च्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धा सोमवारपासून नाशकात
अकोला : नाशिक औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे तर्फे नाशिक येथे महानिर्मिती कंपनीच्या राज्यस्तरीय आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्य स्पर्धेचे आयोजन १९ ते २३ आॅगस्ट २०१९ या कालावधीत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन १९ आॅगस्ट रोजी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह (भा.प्र.से.), यांच्या शुभ हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक वी.थंगपांडीयन, वित्त संचालक संतोष आंबेरकर उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी सांघिक नियोजन व संवादचे कार्यकारी संचालक सतीश चवरे, राख आणि सौर उर्जा चे कार्यकारी संचालक कैलास चिरूटकर, माहिती तंत्रज्ञान कार्यकारी संचालक नितिन चांदुरकर, प्रकल्प कार्यकारी संचालक संजय मारूडकर यांची विषेश उपस्थित लाभणार आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २३ आॅगस्ट रोजी महानिर्मितीचे संचलन संचालक चंद्रकांत थोटवे याचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खनिकर्म संचालक पुरुषोत्तम जाधव उपस्थित रहाणार आहेत. या प्रसंगी मानव संसाधनचे कार्यकारी संचालक भीमाशंकर मंता, कोळसा आणि गरेपालमा कार्यकारी संचालक राजु बुरडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे हे प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत. पारितोषिक वितरणावेळी विशेष अतिथी म्हणून सुप्रसिध्द सिने नाटय अभिनेता सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत.
दहा नाट्यप्रयोगांचे सादरीकरण
या स्पर्धे दरम्यान विविध विज निर्मिती केंद्रांतर्फे एकुण १० नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, कोराडी, खापरखेडा, परळी, भुसावळ, पारस, चंद्रपुर हे औष्णिक वीज केंद्र, तर पोफळी जल विद्युत केंद्र आणि उरण वायु विद्युत केंद्र तसेच सांघिक कार्यालय, मुंबई हे संघ सहभागी होणार आहेत.