शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

येत्या वर्षात होणार राज्य हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:57 IST

राज्यात स्वच्छता मोहीम जोरात सुरू  असून, येत्या २0१८ पर्यंत राज्य हगणदरीमुक्त होईल, असा विश्‍वास गृह, नगरविकास राज्य तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम सुरू  केला असून, १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हगणदरीमुक्त संदर्भात अकोला राज्यात दुसर्‍या क्रमाकांवर असून, लवकरच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही अकोला सर्वात पुढे राहील, असेही त्यांनी अधोरेखित केले.

ठळक मुद्देपालकमंत्री रणजित पाटील अकोला  दुसर्‍या क्रमाकांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात स्वच्छता मोहीम जोरात सुरू  असून, येत्या २0१८ पर्यंत राज्य हगणदरीमुक्त होईल, असा विश्‍वास गृह, नगरविकास राज्य तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम सुरू  केला असून, १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हगणदरीमुक्त संदर्भात अकोला राज्यात दुसर्‍या क्रमाकांवर असून, लवकरच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही अकोला सर्वात पुढे राहील, असेही त्यांनी अधोरेखित केले.‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम पंतप्रधानांनी सुरू  केला आहे. राष्ट्रपतींनी कानपूर येथून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यानुषंगाने राज्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या कामात स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्षांना सामावून घेतले जाणार आहे. दोन पातळीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात महानगरपालिका तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वाची भूमिका असेल. लोक सहभागही यात असेल. या उपक्रमात श्रमदान, सेवा करू न स्वच्छता उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी रविवारी सर्किट हाउस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अकोला शहरात १६ हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली असून, सार्वजनिक तसेच ‘पेड अँण्ड युज’चा वापर वाढला आहे. शहरात ११0 जागांवर शौचालये बांधली आहेत. १२0 घनकचरा उचलणार्‍या गाड्या शहरात सुरू  आहेत. हे आणि हगणदरीमुक्तचे काम बघता जिल्हा व राज्यस्तरीय समितीने अकोला शहराला प्रमाणित केले आहे. ही सर्व पाहणी केली असून, अनेक भागात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. घनकचर्‍याचे व्यवस्थापन आता आधुनिक तंत्र वापरू न केले जाणार असून, ओला आणि सुका कचरा वेगळा करू न शहरात ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खतनिर्मितीसाठीचे प्रयत्न मनपातर्फे केले जाणार आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीचे काम बचत गट, स्वयंसेवी संस्थांना दिले, तर ते अधिक चांगली देखभाल करतील, असेही ते म्हणाले. शहर व जिल्हय़ातील नागरिक, जनतेने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमास राज्य आणि जिल्हा स्तरावरू न लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. या उपक्रमाच्या व्यापक प्रसारासाठी गाव स्तरावर संवादकांची निवड केली जात असून, या अभियानाचा प्रत्येक दिवसाचा तसेच उपक्रमाचा सचित्र अहवाल २ आक्टोबरपर्यंंत पाणी व स्वच्छता साहाय्य संस्थेकडे पाठविला जाणार आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, महापालिकेचे आयुक्त अजय लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांची उपस्थिती होती.