अकोला: बार्शीटाकळी येथे स्टेट बॅंक शाखेच्या इमारतीला भीषण आग; बियर बार जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 07:38 IST2022-06-03T07:37:01+5:302022-06-03T07:38:50+5:30

या ईमारतीच्या वर असलेले पंकज वाईन बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

state bank branch building at barshitakali in akola catches fire burn beer bar on building | अकोला: बार्शीटाकळी येथे स्टेट बॅंक शाखेच्या इमारतीला भीषण आग; बियर बार जळून खाक 

अकोला: बार्शीटाकळी येथे स्टेट बॅंक शाखेच्या इमारतीला भीषण आग; बियर बार जळून खाक 

बार्शीटाकळी (जि. अकोला): बार्शीटाकळी शहरातील मंगरुळपीर अकोला रस्त्यावरील बायपास चौकात असलेल्या भारतीय स्टेट बॅंक शाखेच्या ईमारतीला ३ जून रोजी सकाळी ५.३५ वाजता भीषण आग लागल्यामुळे इमारतीवर जाळांचे लोट पहायला मिळत होते.

या ईमारतीच्या वर असलेले पंकज वाईन बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यात असलेले फर्निचर व देशी विदेशी मद्याचा साठा आगीत जळून खाक झाल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे. बँकेची ब्राड् बंड सेवा विसकळित झल्याने आज बंकेचे व्यवहार ठप्प राहतिल, दरम्यान बँकेचे अन्य नुकसान झालेले नाही. कुठ्लिच जीवित हानी झाली नाही. वृत्त लिहेपर्यत फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहचल्या नव्हत्या. सदर आग गॅस सिलिंडरमुळे लागल्याची चर्चा आहे.
 

Web Title: state bank branch building at barshitakali in akola catches fire burn beer bar on building