शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सात ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरू

By admin | Updated: May 8, 2015 01:42 IST

केंद्र शासनाने राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांंना दज्रेदार शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या निवासी शाळा योजनेंतर्गत राज्यात सात ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत एकलव्य निवासी शाळा चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या आहेत. देशभरातील आदिवासी जातीच्या विद्यार्थ्यांंना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने केंद्र शासनाने राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यात २00१ पासून आदिवासी विद्यार्थ्यांंसाठी नाशिक, ठाणे जिल्हय़ातील कांबळगाव, अमरावती जिल्हय़ातील चिखलदरा व नागपूर जिल्हय़ातील खैरीपरसोडा येथे इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंंत एकलव्य निवासी शाळा सुरू केल्या. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात २0१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून पिंप्रीसद्रोद्दिन, ता. इगतपुरी, जि. नाशिक, नंदूरबार, ता.जि. नंदूरबार, बोरगाव, ता. देवरी, जि. गोंदिया, तुमरगुंडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथे, तर वर्ष २0१५- १६ या शैक्षणिक वर्षापासून शेंडगाव (भातसानगर), ता. शहापूर, जि. ठाणे, अजमेर सौंदाने, ता. सटाना. जि. नाशिक व मावेशी (राजूर), ता. अकोले, जि. अहमदनगर या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता ६ वी ते १२ पर्यंंतच्या शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या सर्व शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांंना शिक्षण दिले जाईल. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येईल. त्याशिवाय निवास, अंथरुण-पांघरुण, भोजन, गणवेश, पाठय़पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मोफत पुरविले जाईल. या शाळांमध्ये ३0 मुले व ३0 मुली, अशा एकूण ६0 विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीत प्रवेश दिला जाईल. प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेऊन गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांंची निवड करण्यात येणार आहे.